राजकीय

वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही जिल्हा जळगाव,तालुका चोपडा मधील वरगव्हन या गावी वंचित बहुजन आघाडी चे ग्रामशाखा

वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही जिल्हा जळगाव,तालुका चोपडा मधील वरगव्हन या गावी वंचित बहुजन आघाडी चे ग्रामशाखा व डॉ. रुस्तम नसीर तडवी यांच्या सहित शेकडो कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्याचा जाहीर पक्ष प्रवेश यावल तालुका अध्यक्ष भगवानभाऊ मेघे साहेब, जळगाव जिल्हा प्रभारी ऍड. रविकांत वाघ साहेब, जळगाव जिल्हा विनोदभाऊ सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष मोहमद शफी शेख, राजेंद्र राजेंद्र बारी जिल्हा संघटक बाबुलाल पटेल शरद अडकमोल रोहन भाई निकम भूषण भाई साळुंखे भूषण भाई जळगाव महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषदादा तायडे यांनी केले. मी यावल तालुका मधील किनगाव या ठिकाणी काही कामाकरिता आलो होतो. तेव्हा संतोष दादा तायडे यांनी या कार्यक्रमाला घेऊन गेले व ग्रामशाखा व पक्ष प्रवेश कार्यक्रमात सहभागी करून घेतले व सत्कार देखील केला. डॉ. तडवी साहेब यांच्या बरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर अनेक मान्यवरांनी पक्ष वाढीसंदर्भात मते मांडली. ऍड. रविकांत वाघ सरांचे भाषण उल्लेखनीय झाले. गाव तिथे शाखा या तत्वावर यावल तालुक्यातील किनगाव पासून सुरवात झाली होती. आता हाच झंझावात संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या गावागावात चालू झालेला आहे. हे कालच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. बहुजन समाजाला जागृत करण्याचे व वंचिताना न्याय मिळवून देण्याचे काम श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्रातील तमाम निष्ठावंत कार्यकर्ते तन मन धनाने करत आहेत. लवकरच महाराष्ट्राला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चांगले दिवस पाहायला मिळणार आहे. सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर रुस्तुम तडवी एक नामवंत मोठे डॉक्टर असून पुण्याला त्यांचं मोठं क्लिनिक आहे आणि ते गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी धावून येतात सर्वप्रथम हजारो लोकांचे जेवण सुद्धा त्या गावात त्यांनी दिलं आणि भाषणा सुद्धा त्यांनी सांगितलं की आता वंचित बहुजन आघाडी शिवाय तडवी समाजाला कोणताही पर्याय नाही हा शेवटचा पर्याय आहे लोकांनी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात रुस्तुम दादाचे स्वागत केले आणि वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद वंचित बहुजन आघाडीचा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब यांचा विजय असो रुस्तम भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडीचा विजय असो अशा घोषणा देऊन गावकऱ्यांनी रुस्तम दादाचे स्वागत केले त्याचप्रमाणे चोपडा तालुक्यातून त्यांना हजारो फोन रुस्तम दादा आम्ही तुमच्या सोबत आहात आम्ही तुमच्या सोबत आहात तुम्ही फक्त आवाज द्या संपूर्ण चोपडा तालुका तुमच्या पाठीशी असेल

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button