पाणी भरणाऱ्या महिलेचा विनयभंग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगावः नळावर पाणी भरत
असतांना दारू पिऊन आलेल्या शेजारच्या इसमाने हात पकडून ३८ वर्षाच्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना ८ मे रोजी रात्री ८ वाजता घडली.
याबाबत पीडितेने शहर पोलिसात फिर्याद दिली की, माझ्या शेजारी राहणारा आरोपी दिनेश
रमेश इंगळे रा. सुदामा नगर शेगाव हा काही एक कारण नसतांना नेहमी शिवीगाळ करतो. ८ मे रोजी रात्रीच्या वेळी नळ आल्याने मी नळावर पाणी भरत असताना आरोपी माझ्याजवळ आला त्यावेळी तो दारू पिलेला होता.
त्याने नळाला लावलेला हांडा उचलत असताना त्याने माझा एकदम हात पकडला व हात ओढुन मला चाल असे म्हणून लागला म्हणून मी त्याला माझा हात सोड असे म्हणून आरडा ओरड केली असता त्याने मला कोणाला काही सागीतले तर तुला तुझे परीवाराला जिवाने ठार मारून टाकील अशी मला धमकी देत पळून गेला आहे. मकआराडा ओरड केला त्या ठिकाणी दोन महिलांनी त्यांचे दारात उभे ही घटना पाहीली आहे. अशा तोंडी रिपोर्टवरून कलम ३५४, ३५४ अ, ५०६ भादवि नुसार गुन्हा
दाखल केला आहे



