बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

,रस्त्यावर रस्ता ,तरीही खस्ता! ,हिवरखेड मध्ये काँक्रिट रस्त्याची दुरावस्था! , काँक्रीट रस्त्याला पाहताच होईल गिट्टी दर्शन !संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्याची मागणी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

हिवरखेड.दि.१६: तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायत ते मेडिकल चौक यादरम्यान बनवलेल्या काँक्रीट रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या काँक्रीट रस्त्याकडे पाहताना काँक्रीट मिश्रणातील गिट्टी नामक घटकाचे मोठ्या प्रमाणात ठळक दर्शन होत आहे. हा नविन रस्ता जुन्याच रस्त्यावर बनवलेला असताना सुद्धा नागरीकांना मोठ्या प्रमाणात खस्ता सहण करावा लागत आहे .हिवरखेड येथील ग्रामपंचायत ते मेडिकल लाईन पर्यंत मोठा उहापोह करून मोठ्या निधी मधून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. बांधकाम करतांना रस्त्यावरील अतिक्रमण सुद्धा हटविले होते. रस्त्याचे उदघाटन करतांना मोठा गाजावाजा सुद्धा केला गेला व काही दिवसातच या रस्त्याचे काम पूर्ण केल्या गेले ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे मात्र अल्पावधीतच हा रस्ता उखडल्याचे चित्र जनतेसमोर उघडे झाले या काँक्रीट रस्त्याचे बांधकाम आरसीसी प्रकारामध्ये केले गेले असुन या रस्त्याच्या बांधकामात वापरल्या गेलेल्या काँक्रीट मधील गिट्टीचे ठळक दर्शन व्हायला लागले हे चित्र असंख्य नागरिक उघड्या डोळ्यांनी बघत आहे, याच रस्त्याच्या बाजूला मेनरोड वर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या कार्यकाळात हिवरखेड चंडिका चौक ते हिवरखेड गोर्धा वेस पर्यंत सदर रस्त्याचे मेनरोड चे बांधकाम करण्यात आले. या रस्त्याला १० ते १५ वर्षे पूर्ण होत असताना अजूनही तो मेनरोड ठीक ठाक दिसतो मात्र आता नव्यानेच तयार झालेला हा रस्ता ज्यांच्या कार्यकाळात बांधला तो रस्ता बांधून काही दिवस झाले नाहीत आणि चक्क रस्ता उखडुन या काँक्रीट रस्त्या मधील गिट्टी बाहेर पडायला लागली. या रस्त्याला भरपूर निधि आला होता मग हा रस्ता असा कसा उखडला? हा रस्ता उखडण्या मागे काय कारणे आहेत? काही मोठी गडबड तर नाही झाली ना? अशा चर्चा, तर्क -वितर्क, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहे. हा रस्ता एवढ्या लवकर कसा उखडला ? या रस्त्या समोरच जुना रस्ता असून तो अजून कसा चांगला आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न?, मग या रस्त्यात नेमका काय घोळ झाला? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी हिंमतीने चौकशी करावी. आणि दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुजान नागरिक करीत आहेत.

रस्त्यावर रस्ता ,तरीही खस्ता!
एकीकडे आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेले गड आणि किल्ले ३५० वर्षानंतर अजूनही सुस्थितीत असताना दिसत आहेत. हल्लीच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञान नवनवीन पद्धती उपलब्ध झाली असताना सुद्धा असे प्रकार घडत आहे ‘एकीकडे रस्त्याचे काम चालू असते तर दुसरीकडे रस्ता उखडतो’ अशी चर्चा जनमानसात असून यामध्ये किती मोठा घोळ होत असेल असा साहजिक प्रश्न सुद्धा जनतेचा आहे. विशेष म्हणजे हा रस्ता आधीच्या सिमेंट काँक्रीट रोडवरच पुन्हा बनविण्यात आला असून याच्या खाली कोणतेही बोल्डर मुरूम अथवा नविन भरती टाकून दबाई करावी लागली नाही. निव्वळ रिनफोर्स्ड सिमेंट काँक्रेट (आर.सी.सी) मध्ये रस्त्याचे बांधकाम करावे लागले तरीपण हा रस्ता उखडल्याने याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून यावर लक्षावधी रुपयाचा खर्च करण्यात आला. या काँक्रीट रस्त्याच्या बांधकामामध्ये अनेकांनी हात धुतले असावे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button