गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बुलढाणा LCB ची मोठी कारवाई: नाफेडचा 270 क्विंटल हरभरा अपहार करणारी टोळी जेरबंद; 18.91 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:-सागर रावणचोरे

May 21, 2026
बुलढाणा :- LCB ची मोठी कारवाई: नाफेडचा 270 क्विंटल हरभरा अपहार करणारी टोळी जेरबंद; 18.91 लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा: धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीतील लाल माती परिसरातून नाफेडचा 270 क्विंटल हरभरा भरलेला ट्रक अपहार करून पळवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) बुलढाणा पथकाला मोठे यश आले आहे. या प्रकरणातील 5 आरोपींना ट्रकसह जेरबंद करून पोलिसांनी एकूण 18,91,750/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

घटनेचा तपशील:
नाफेडचा हरभरा वाहतूक करणारा ट्रक धामणगाव बढे हद्दीतील लाल माती परिसरातून आरोपींनी अपहार करून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर LCB पथक समांतर तपास करत होते.

LCB ची कारवाई:
तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या आधारे LCB पथकाने सापळा रचून पाचही आरोपींना मलकापूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अपहार केलेला हरभरा व गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा एकूण 18,91,750/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जेरबंद आरोपी

  1. शेख आमीन शेख जमील, वय 33, रा. पारपेठ, मलकापूर
  2. शेख समीर शेख सलीम, वय 27, रा. पारपेठ, मलकापूर
  3. शेख सादीक शेख नुरमोहम्मंद, वय 24, रा. पांढरी पारपेठ, मलकापूर
  4. मो. मुस्तकीन मो. मुशीर शेख, वय 34, रा. इदगाह प्लॉट, मलकापूर
  5. सोहिल खान उर्फ शोएब युनुस खान, वय 23, रा. पारपेठ, मलकापूर

पथकाचे अभिनंदन:
सदरची कामगिरी मा. श्री. निलेश तांबे, पोलीस अधीक्षक, बुलढाणा, मा. श्री. अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणामा. श्री. श्रेणीक लोढा, अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

कारवाई करणारे पथक:
श्री. सुनिल अंबुलकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा, श्री. अविनाश जायभाये, पोलीस उपनिरीक्षक, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, विजय पैठणे, पोकॉ गजानन गोरले, चासफी विकास देशमुख, निवृत्ती पुंड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा, तसेच पोहेकॉ राजु आडवे, तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

पुढील तपास धामणगाव बढे पोलीस करत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button