
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
संपादकीय

मुक्ताईनगर : पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया नसून समाजातील घडामोडींवर सजगपणे लक्ष ठेवत जनतेच्या भावना आणि समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. अशा जबाबदार पत्रकारितेचा वारसा जपत आपल्या प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि मार्मिक लेखनशैलीमुळे ओळख निर्माण करणारे पत्रकार अमोल वैद्य यांनी आता “संपादक” पदाच्या नव्या जबाबदारीची धुरा स्वीकारली आहे.दैनिक ‘साईमत’मधील कार्यकाळानंतर अमोल वैद्य यांची ‘मुक्ताई दूत’ दैनिकाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास दहा वर्षांच्या पत्रकारितेच्या अनुभवातून त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक विषयांवर निर्भीडपणे लेखन केले आहे. चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेची मूल्ये जपत समाजहिताचा दृष्टिकोन कायम ठेवणाऱ्या वैद्य यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.तळागाळातील नागरिकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाच्या त्रुटींवर प्रकाश टाकणे आणि जनतेच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठविणे, ही त्यांची पत्रकारितेची ओळख राहिली आहे. याच प्रामाणिक व लोकाभिमुख भूमिकेमुळे आज ते संपादकपदापर्यंत पोहोचले असून विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.मुक्ताईनगर येथे पत्रकार संघटनेच्या वतीने अमोल वैद्य यांचा सत्कार करून त्यांच्या नाविन्यपूर्ण संपादकीय लेखणीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. आगामी काळातही त्यांनी निर्भीड, निष्पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारितेची परंपरा अधिक सक्षमपणे पुढे न्यावी, अशी अपेक्षा वाचकवर्ग तसेच समाजातील विविध घटकांकडून व्यक्त केली जात आहे.संपादक म्हणून सुरू झालेला हा नवा प्रवास पत्रकारितेच्या मूल्यांना अधिक बळकटी देणारा ठरो, हीच सर्वांची सदिच्छा.



