जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भ

तामसवाडीतील इमामांवरील हल्ल्याचा मुक्ताईनगर सकल मुस्लिम समाजाकडून जाहीर निषेध

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

तामसवाडीतील इमामांवरील हल्ल्याचा मुक्ताईनगर सकल मुस्लिम समाजाकडून जाहीर निषेधहाफीज हकम अली यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत कारवाईची मागणीमुक्ताईनगर, दि. 12 जून 2026 : परोळा तालुक्यातील तामसवाडी (जि. जळगाव) येथे मस्जिदचे इमाम हाफीज हकम अली यांच्यावर काही व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडल्याने मुक्ताईनगर शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा मुक्ताईनगर सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.समाजातील नागरिकांनी या घटनेचा निषेध नोंदवत धार्मिक स्थळांशी संबंधित व्यक्तींवर होणारे हल्ले हे सामाजिक सलोखा व शांततेस बाधा आणणारे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.या निषेध प्रसंगी शकूर जमदार, जुबेर अली, नगरसेवक नईम बागवान, माजी नगरसेवक अमीनभाई, फिरोज सय्यद, वहाब खान, अनिस पटेल, इरफान बागवान, दाऊद टेलर, इमरान पटेल, जावेद खान, शफीक शेख यांच्यासह सकल मुस्लिम समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते.मुक्ताईनगर सकल मुस्लिम समाजाने शांतता, बंधुता आणि कायद्यावरील विश्वास कायम ठेवत प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button