खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

प्रवाशांना आरामदायी सफर; जळगावला मिळणार 178 बसांचा ताफा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) ने जिल्ह्यासाठी तब्बल 178 नवीन बसेस मंजूर केल्या आहेत. मार्च 2026 च्या सुरुवातीपासून या बसेस जळगाव विभागात दाखल होणार असून शहरासह ग्रामीण भागातील प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे.सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासासाठी अनेक प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. राज्य शासनाकडून प्रवाशांसाठी विविध सवलती व योजना सुरू केल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन जळगाव एसटी विभागाने अतिरिक्त बसची मागणी केली होती. त्यानुसार 178 नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पूर्वी लक्झरी स्वरूपातील 2 बाय 2 बसमध्ये 55 आसने होती. मात्र आता 3 बाय 2 आसनरचनेच्या बसेसमुळे अधिक प्रवाशांना बसण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रवाशांची उभे राहून प्रवास करण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.नवीन बसेस दाखल झाल्यानंतर गर्दीचा ताण कमी होईल, तसेच प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर सेवा मिळेल. या बसेस शहर ते तालुका आणि ग्रामीण मार्गांवर धावणार आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button