बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

नोव्हेंबर महिन्यातील आकाशातील होणाऱ्या विविध घडामोडी! उल्का वर्षाव ,वलयांकित शनी ग्रह ,पृथ्वीच्या सानिध्यात गुरु ग्रह ,जगातील सर्वात महाग अंतराळ संशोधन व प्रशिक्षण केंद्र असलेले इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आकाशात पाहता येणार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा प्रतिनिधी- विजय घोडे;
नोव्हेंबर महिन्यामध्ये खगोल प्रेमींकरिता आनंदाची बातमी ,गुलाबी थंडीच्या दिवसात आणि दिवाळीच्या उत्सवातील उत्साहात आकाशात विविध प्रकारच्या घटना आपल्या आनंदात निश्चित भर टाकतील, त्यात प्रामुख्याने उल्का वर्षावाचे निमित्ताने दिवाळी पूर्व व दिवाळी पश्चात आकाश दिवाळी, गुरु ग्रहाचे पृथ्वी सान्निध्य,ग्रह चंद्र युती, ग्रह दर्शन, बुध ग्रह उदय, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आदींचा मनसोक्त आनंद घेण्याचे आवाहन विश्व-
भारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.

गुरु ग्रहाचे पृथ्वी सान्निध्य

सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतांना त्यांचे पृथ्वी मधील अंतर कमी जास्त होत असते.

येत्या ३ नोव्हेंबरला सूर्यमालेत सर्वात मोठा असलेला गुरु ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याने या कालावधीत गुरु ग्रह आकाशात आकाराने मोठा व रात्रभर दर्शन देणार आहे,
या उत्साही वातावरणात
सूर्य,पृथ्वी व गुरु ग्रह एका रेषेत येत असल्याने सध्या या ग्रहाचे वास्तव्य मेष या राशीचक्रातील पहिल्या राशीत आहे.त्यामुळे मेष राशीतील हामाल,शेराटान व मेसार्टिम या तीन ताऱ्यांचा परिचय होईल.

धृवतारा आणि ग्रह दर्शन

याच वेळी आकाश मध्याशी कुंभ राशीत शनी ग्रह आणि पहाटे पुर्वेस सर्वात तेजस्वी शूक्र ग्रह, तसेच उत्तर आकाशात
सप्तर्षी तारका समूहातील पहिल्या दोन ताऱ्यांचे सरळ रेषेत धृवतारा पाहता येईल.
दि.५ नोव्हेंबर पासुन पश्चिम आकाशात बुध ग्रहाचा उदय होत आहे.

दिवाळी पूर्व व दिवाळी पश्चात आकाश दिवाळी

गुलाबी थंडीच्या दिवसांत दिवाळीचे आधी दि.४,५,१३
च्या रात्रीच्या प्रारंभी वृषभ राशी समुहातून दरताशी दहा या प्रमाणात तारे तुटतांना बघून दिवाळी पूर्व आकाश दिवाळीचा तर दि.१७ व १८चे पहाटे पुर्वेस सिंह राशी समुहातुन उल्कांचा आनंद घेता येईल.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दर्शन

दि.८,१०,११,१२व१४ ला जगातील सर्वात महाग अंतराळ संशोधन व प्रशिक्षण केंद्र असलेले इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आकाशातून चांदणी फिरताना पाहता येईल.

ग्रह आणि चंद्र भेटी
९ नोव्हेंबरला पश्चिमेस शूक्र हा तेजस्वी ग्रह चंद्रासोबत युती तर काही ठिकाणी पीधान युती करेल.दि.१४ ला
बालकदिनी सूर्याचे लाडके बाळ अर्थात बुध ग्रह पृथ्वीच्या बाळाचे
बरोबर म्हणजे चंद्राजवळ युती स्वरूपात असेल.२० ला शनी ग्रह तर २५ ला.गुरु ग्रह चंद्राजवळ बघता येईल. इत्यादी घडामोडींचा आपण सर्वांनी मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन विश्वभारती केंद्र अकोला चे संचालक प्रभाकरजी दोड यांनी केले आहे तसेच अधिकच्या माहिती करता सदैव विश्वभारती केंद्र आपल्या सोबत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button