देऊळगाव राजा येथील व्यापारी संकुलाला ‘स्व. अजितदादा पवार व्यापारी संकुल’ नाव; जनसेवा सप्ताहातंर्गत नामकरण सोहळा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी, शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :
नगर परिषद देऊळगाव राजा यांच्या वतीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘जनसेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून शहरातील नवनिर्मित व्यापारी संकुलाचे “स्व. अजितदादा पवार व्यापारी संकुल” असे नामकरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेरजी काझी यांच्या हस्ते या संकुलाचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
स्व. अजितदादा पवार यांनी जनतेच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान, त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्य शहराच्या आणि जनतेच्या चिरंतन स्मरणात राहावे, या उद्देशाने नगर परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नामकरणाच्या माध्यमातून त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला नगर परिषदेच्या वतीने विनम्र आदरांजली वाहण्यात आली.
या सोहळ्याला स्थानिक आमदार श्री. मनोजभाऊ कायदे, नगराध्यक्ष माधुरीताई शिपणे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुणजी मोकळ, उपाध्यक्ष सौ. वनिता भुतडा आणि गटनेते प्रदीप वाघ, बांधकाम सभापती विष्णू झोरे,प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या विकासकामांचा गौरव केला व हे संकुल शहरातील व्यापाराला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी हाजी सिद्दिक शेठ, धनशिराम शिपने साहेब,संतोष खांडेभराड, गोविंद झोरे, सुभाष दराडे,दिलीप झोटे सर, सुनील शेजुळकर, सदाशिव मुंडे, यांच्यासह नगर परिषदेच्या विविध विभागांचे सभापती, आजी-माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी बांधव आणि नगर परिषदेचे कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



