बुलढाणामहाराष्ट्र

हयगय नाही! बिबी पोलीस स्टेशन चा लाचखोर हेड कॉन्स्टेबल ज्ञानबा सोसे निलंबित; एस पी सुनील कडासनेंची कारवाई….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

बिबी पोलीस स्टेशन चा लाचखोर पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानबा सोसे ३५०० रुपयांची लाच घेतांना बुलढाणा एलसीबीच्या जाळ्यात अडकला होता. एस पी सुनील कडासने यांनी लाचखोराची हय गय न करता तातडीने निलंबन केले आहे.
लाचखोर ज्ञानोबा सोसे याने तक्रारदाराला ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार व त्याच्या कुटुंबीयांवर कलम ४९८अंतरर्गत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने जमांती वॉरंट काढल्याने”तुझी व कुटुंबीयांची अटक टाळतो, ३५ हजार रुपये लागतील अशी मागणी त्यांनी केली होती. तडजोडी अंती ३५ हजार रुपये घेण्याची तयारी सोसे यांनी दाखवली. तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार केली. प्रकरणाची खात्री झाल्यानंतर एसीबीने लावलेल्या सापळ्यात लाचखोर सोसे आणि दीदी पोलीस ठाण्यातील अंशकालीन सफाई कामगार विजय उबाळे अलगद अडकला.
दोघांवर बीबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आज, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी लाचखोर पोलीस हेड कॉन्स्टेबल सोसे याला निलंबित केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button