Uncategorized

राहुरी येथील जुन्या सरकारी दवाखाण्यासमोरील (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या चौकामधील गणपती मंदिर पाडले.

राहुरी नवी पेठ येथील जुन्या सरकारी दवाखान्यात समोरील व डॉक्टर अण्णा भाऊ साठे चौकातील पन्नास वर्षापासून असलेले पारंपरिक गणपती मंदिर हे अतिक्रमानामध्ये आहे असे म्हणून पाळण्यात आलेले आहे सदर न्यू स्टार मित्र मंडळाचे १९७२ सालापासून५०ते ६० वर्षा पूर्वी चे गणपती मंदिर होते ते मंदिर कोणत्याही अतिक्रमणं मध्ये किवा रस्त्यात नसताना देखील व मंडळाला कोणतीही पूर्व सूचना न देता केवळ सकल हिंदू समाजाच्या द्वेषसाठी पाडण्यात आले. सदर मंदिरा मध्ये गणपती ची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या लहान लहान स्वरूपातील मुर्त्या आणि प्रतिमा होत्या
सदर मित्र मंडळ व तेथील स्थानिक नागरिक हे दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्री तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच अनेक महापुरुषाच्या जयंती तसेच पुण्यतिथी साजरी करत आलेले आहेत
या सर्व गोष्टी प्रशासनाला पूर्वीपासून माहिती असून तरीदेखील मित्र मंडळाला व तेथील स्थानिक नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता तिथे असणारे पारंपारिक मंदिर पाडण्यात आले
तरी राहुरी शहरात इतर ठिकाणी सुद्धा काही इतर धर्मियांची अतिक्रमणे भर रस्त्यात असताना त्यावर मात्र काही कारवाई झाली नाही परंतु फक्त गणपती मंदिरात का पाडण्यात आले? असा प्रश्न तेथील स्थानिक नागरिकांना पडलेला आहे. फक्त हिंदू द्वेशसाठी ही कारवाई करण्यात आली का ? झालेल्या घटनेमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना खूप दुखावल्या आहे तरी हिंदू समाजाचे जनक्षोभ उसलण्यान आधी नगरपालिकेने त्वरित हे गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी बांधून द्यावे नाहीतर पुढील हिंदू जनक्षोभ झाल्यास नगरपालिका जबाबदार राहील. व पाडलेले मंदिर तात्काळ बांधून न दिल्यास न्यू स्टार ग्रुप च्या वतीने व तेथील स्थानिक नागरिकांच्या वतीने तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने नगरपरिषद राहुरी या ठिकाणी लवकरात लवकर उग्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा न्यू स्टार मित्र मंडळ व स्थानिक नागरिकांनी दिलेला आहे.

राहुरी प्रतिनिधी: चंद्रकांत जगधने

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button