राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचाशुभारंभ: नगराध्यक्षा सौ. माधुरीताई तुषार शिपने यांच्या हस्ते संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :– शंकर शिवरकर
देऊळगाव राजा , दि. २८ जून २०२६ :ग्रामीण रुग्णालय,देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा
शुभारंभ नगरपालिका ,नगराध्यक्षा. सौ.माधुरीताई शिपने यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण वानखेडे, डॉ. किशोर गिते, डॉ अक्षय गुठे, परिचारिका रेखा जाधव, काजल कांबळे,प्रकाश चेके, राजु काकड, गजानन मिसाळ,
तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिका प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ .माधुरीताई तुषार शिपने यांनी तालुक्यातील सर्व पालकांना आवाहन केले की, 5 वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे
सर्व पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्षांखालील बालकांना पल्स पोलिओ लसीचे दोन थेंब आवर्जून पाजून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात विविध स्तरांवर व्यापक जनजागृती करण्यात येत असून पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.



