जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर

अंतुर्ली परिसरात तिसऱ्यांदा अतिवृष्टीचा कहर; केळी पिकाचे १०० टक्के नुकसान, शेतकरी हतबल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

अंतुर्ली (प्रतिनिधी) : अंतुर्ली व परिसरात सलग तिसऱ्यांदा झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांसह शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, गटारी तुडुंब भरल्या तर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले आहे. ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले असून साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.अतिवृष्टीमुळे शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर उभी असलेली केळीची झाडेही या मुसळधार पावसामुळे कोलमडून पडल्याने केळी पिकाचे जवळपास १०० टक्के नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.दरम्यान, एवढे मोठे नुकसान होऊनही पिक विमा कंपनीकडून अद्याप पंचनामे करण्यात आलेले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. वेळेवर पंचनामे न झाल्याने नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून विमा कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोपही शेतकरी करीत आहेत.सततची नैसर्गिक आपत्ती, वाढते आर्थिक संकट आणि प्रशासनाकडून अपेक्षित गतीने मदत न मिळाल्याने परिसरातील शेतकरी हतबल, निराश आणि चिंताग्रस्त झाले आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी तसेच बाधित शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी अंतुर्ली व परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button