Uncategorized

राम रहीम रिअल इस्टेट आणि पाटील हार्डवेअर चे संचालक यांनी भाविक भक्तांसाठी येणाऱ्या दिंडी सोहळ्यासाठी लावलेल्या चहा नाश्ता पाण्याच्या स्टॉलला आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट केले कौतुक

राम रहीम रिअल इस्टेट आणि पाटील हार्डवेअर चे संचालक यांनी भाविक भक्तांसाठी येणाऱ्या दिंडी सोहळ्यासाठी लावलेल्या चहा नाश्ता पाण्याच्या स्टॉलला आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट केले कौतुक

(दिनांक 17/ 2/ 2022 तालुका

प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):-सविस्तर वृत्त असे की सालाबादप्रमाणे मुक्ताईनगर मध्ये यावर्षी सुद्धा संत मुक्ताबाई यात्रोत्सव सुरू झालेला असून ठीक ठिकाणी मुक्ताईनगर शहरातील दानशूर व्यक्ती आपण सुद्धा समाजाचे देणे लागतो या हेतूने आणि भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी चहा नाश्ता पाणी ज्यांना जे शक्य होईल अशी व्यवस्था करत असतात त्याप्रमाणे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या राम रहीम रियल इस्टेट तसेच पाटील हार्डवेअर चे संचालक योगेश्वर पाटील आणि रवी पाटील या दोन्ही बंधूं नेहमीच सामाजिक कार्यात आपल्या कमाईतून सामाजिक कार्यासाठी खर्च करत असतात सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी राम रहीम चेंबर समोर मुक्ताईनगर मध्ये पंचक्रोशीतून येणाऱ्या भावी भक्तांसाठी चहापान नाश्त्याची सोय करून दिलेली आहे या ठिकाणी शेकडो भक्तांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि घेत आहेत यामध्ये स्वतः योगेश्वर पाटील तसेच त्यांच्या परिवारातील महिला सदस्य सुद्धा प्रत्येक भाविकांना चहापाणी वाटप करताना दिसत आहेत या कार्यक्रमाला मुक्ताईनगरचे आमदार माननीय चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा भेट दिली आणि यांचे कौतुक केले या स्तुत्य उपक्रमाचे त्यांच्या मित्र परिवारातून सुद्धा कौतुक केले जात आहे आणि जास्तीत जास्त लोकांना सेवा कसे देता येईल याकडे स्वतः योगेश्वर पाटील हे लक्ष देत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button