महाराष्ट्रविदर्भ

राज्यअतिक्रमणाचे चौथे दिवशी गजराजने घेतला ब्रेक…पुढील आठवड्यात पुन्हा कार्यप्रवण होणार…पालिकेद्वारे माहिती घेणे…राज्यविविधअतिक्रमणाचे चौथे दिवशी गजराजने घेतला ब्रेक…पुढील आठवड्यात पुन्हा कार्यप्रवण होणार…पालिकेद्वारे माहिती घेणे सुरू…

राज्यअतिक्रमणाचे चौथे दिवशी गजराजने घेतला ब्रेक…पुढील आठवड्यात पुन्हा कार्यप्रवण होणार…पालिकेद्वारे माहिती घेणे…राज्यविविधअतिक्रमणाचे चौथे दिवशी गजराजने घेतला ब्रेक…पुढील आठवड्यात पुन्हा कार्यप्रवण होणार…पालिकेद्वारे माहिती घेणे सुरू…

आकोट- प्रतिनिधी

आकोट शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या चौथ्या दिवशी मोहीम बंद ठेवण्यात आली असून आगामी महाशिवरात्री व छत्रपती शिवराय जयंती या सणांच्या बंदोबस्तात पोलीस गुंतल्याने हा ब्रेक घेण्यात आला आहे. परंतु हे सण आटोपल्यावर पुढील आठवड्यात ही मोहीम पुन्हा कार्यप्रवण होणार असून यादरम्यान पालिकेद्वारे शहरातील अतिक्रमणांची सखोल माहिती घेणे सुरू आहे.महाशिवरात्री आणि छत्रपती शिवरायांची जयंती आकोट शहरात मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत असते. या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असतो. त्याचा परिणाम सध्या शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेवर झाला आहे. या सणांच्या बंदोबस्तात पोलीस गुंतले आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेकरता आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध होऊ शकत नव्हता. या कारणाने चौथ्या दिवशी ही मोहीम बंद ठेवण्यात आली. हे दोन्ही मोठे सण आटोपल्यावर पुढील आठवड्यात ही मोहीम पुन्हा आरंभ होणार आहे. या ब्रेक कालावधीमध्ये मात्र पालिकेने शहरातील अतिक्रमणांची माहिती घेणे सुरू केले आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण थांबले त्या ठिकाणच्या अतिक्रमित अथवा अनधिकृत बांधकामांच्या कागदपत्रांची शोधाशोध सुरू झाली आहे. याच दरम्यान शहराच्या नंदीपेठ भागातील रस्ता मोकळा करण्याकरिता या भागात भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button