बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नागरिकांना सहकार्याचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- शंकर शिवरकर
देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व 115 मतदान केंद्रांवर मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR-२०२६)दिनांक 30 जून 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत दिनांक 30 जून 2026 पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळणी करणार असून मतदार यांनी ENUMERATION FORM चे वाटप करणार असून सदर फॉर्म भरून ते मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना परत करणे , नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची माहिती तसेच इतर आवश्यक नमुने भरून घेण्याचे काम करणार आहेत.
तरी देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे. पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्याची तसेच विद्यमान मतदारांनी आपली माहिती अचूक असल्याची खात्री करून घेण्याची संधी या विशेष मोहिमेद्वारे उपलब्ध होणार आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे मतदार म्हणून नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button