शासनआपल्या दारी आणि प्रवासी रस्त्यावर

शासनआपल्या दारी आणि प्रवासी रस्त्यावर
प्रतिनिधी – मुंबई
*शासनआपल्या दारी आणि प्रवासी रस्त्यावर* महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक महाराष्ट्र भर प्रवास करत असतात परंतु शासन आपल्या दारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्या अंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक आगारात तून 30-25 20 अशा बसेसची मागणी करण्यात आली आणि त्यात सरकारी अधिकारी यांना दिलेल्या वेळेवर हजर राहण्याचे आदेश असल्याने त्यांना जावे लागणारच त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बस सेवेच्या माध्यमातून कामाला जाणारे नोकर वर्ग शालेय विद्यार्थी शेतात काम करणारे मजूर वर्ग महामंडळाचे कर्मचारी बसेस नसल्यामुळे आज त्यांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली आहे. हेच ते सरकार शासन आपल्या दारी आणि प्रवासी रस्त्यावर याकडे प्रशासकीय आगर प्रमुख यांची देखील घुसमट झाली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी यांना सुद्धा त्यांच्या कार्यालयावरती जाण्यासाठी बसेस मिळाल्या नाही .अशी आजा अवस्था झाली सर्वसामान्य नागरिकांची देखील प्रशासकीय नोकर वर्गाची देखील आणि प्रशासकीय कामकाज करणाऱ्या लोकांचे देखील आज हाल झाले सरकार आपल्या दारी हे म्हणणं कितपत योग्य आहे. ज्यामुळे लोकांना त्रास होत आहे हे कुठेतरी थांबलं गेले पाहिजे सरकार हे लोकांच्या सर्वसामान्य सुविधांसाठी उपलब्ध असते पण, यामध्ये सर्वसामान्य लोकांनाच त्रासाला समोर जावे लागते. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हे म्हणणारे राजकीय नेते कुठे आहे.
सामान्य नागरिकांना त्रास होत असून सुद्धा शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची शाळा बंद करण्यात आली असे सक्तीचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आलेले आहे.मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत करणारे ते गरीब पालक आज त्यांच्या मुलांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार अशी पालकांचे आरोप करण्यात येत आहे . असे विविध प्रसार माध्यमातून माहिती देण्यात येत आहे. पोस्टर प्रदर्शन करण्यासाठी अतिरिक्त खर्च जळगाव जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे. असे सामान्य नागरिकातून बोलले जात आहे शासन आपल्या दारी या ब्रीदवाक्यातून लोकांना त्रास सक्ती करण्यात आलेली आहे राशन धान्य दुकानदारांना सुद्धा देखील सक्ती आहे जर ते नाही आलेत नाही थांबलेत तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असे सामान्य लोकांनी मत व्यक्त केले आहे.
सर्वसामान्य रेशन धारक नागरिक स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य जे मिळत आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळत आहे जर हे मोफत धान्य आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचे असेल तर सभेला हजर राहावे अन्यथा तुमचे चार ते सहा महिन्याचं मोफत धान्य हे बंद करू असे लोकांना दम दिल्या गेल्याचे माहिती प्रसारमाध्यमातून प्रकाशित केली आहे.
शासकीय यंत्रणेचा अयोग्य पद्धतीने वापर करून पाहत आहे असा आरोप सामान्य जनतेतून व्यक्त केला जात आहे.



