युवा पिढीनी युवा उघोजक व प्रगतीशील युवा शेतकरी व्हावे.. निलेश देशमुख

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:गजानन तांगडे, खामगांव
आज दिनांक 28/09/2026 रोजी खामगाव तालुक्यातील राहुड येथे प्रगतशील युवा शेतकरी श्री सुनील देशमुख यांनी आज दाखवून दिले कि युवा पिढी सुद्धा चांगल्या प्रकारे कपाशी लागवड करून उत्पादन घेऊ शकते यांच्या शेतामध्ये रासी सीड्स कंपनीने पीक पाहनी कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी मोठया संख्येने उपस्थिती दाखवली होती व रासी सीड्स कंपनीच्या वतीने युवा शेतकरी सुनिल देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित रासी सीडस कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सोनुले साहेब व तालुका कंपनी प्रतिनिधी श्री गजानन गावंडे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे विद्यार्थ्यी जिल्हा उपप्रमुख निलेश भाऊ देशमुख होते यावेळी बनसोडे भाऊ निलेश राहणे सौरव अभोंरे हर्षल अभोंरे पंडीतबापु देशमुख संतोष अभोंरे शामराव देशमुख शिवाजी कवळे, गौरव राहणे , कृष्णा घोराडे , ओम अभोरे अक्षय देशमुख, सोपान कवळे , व मोठ्या संख्येने शेतकरी व गावकरी उपस्थित होते.



