बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जिगाव प्रकल्प – नदीजोड प्रकल्पातून वगळलेल्या गावांचा समावेश करण्यासाठी संघर्ष!जी.डी. रोकडे खामगाव प्रतिनिधी…जिगाव प्रकल्प व नदीजोड प्रकल्पातून वगळण्यात आलेल्या गावांचा समावेश करण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने लवकरच गावकऱ्यांच्या भेटी घेऊन जनजागृती करण्यात येणार असून, संबंधित गावांमध्ये आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल.

वरील सर्व गावे आजही दुष्काळाच्या समस्येला सामोरे जात आहेत. या गावांतील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा मिळावी तसेच नागरिकांच्या पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी संघर्ष समिती सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.

आपला आजचा संघर्ष, आपल्या उद्याच्या पिढीसाठी!

आपल्या गावाचा दुष्काळ कायमस्वरूपी दूर व्हावा, आपल्या गावातील शेतजमीन ओलीताखाली यावी आणि येणाऱ्या पिढीला दुष्काळाचा सामना करावा लागू नये, यासाठी गावकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मनःपूर्वक आभार.

येणाऱ्या पिढीने दुष्काळ पाहता कामा नये!
प्रत्येक शेतजमीन ओलीताखाली आली पाहिजे!
शेतीसाठी आणि पिण्यासाठी कायमस्वरूपी पाणी मिळाले पाहिजे!

आज आपण केलेला संघर्ष हा केवळ आपल्या गावासाठी नाही, तर आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे.

“आजचा संघर्ष — उद्याच्या पिढीचा फायदा!”

जिगाव प्रकल्प – नदीजोड प्रकल्प संघर्ष समिती.

मंगेश भारसाकळे
मुख्य संयोजक संघर्ष समिती

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button