महाराष्ट्रविदर्भ

, बुलढाणा तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर, शेतकरी बांधवांसाठी मा. देवाभाऊंचा संवेदनशील निर्णय, २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा:

जी.डी. रोकडे खामगाव प्रतिनिधी..

महाराष्ट्रातील कोरड्या दुष्काळात पोळणार्‍या शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे. बुलढाणा तालुक्यांसह संपूर्ण बुलढाणा जिल्हा आणि राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, ‘ट्रिगर-१’ अंतर्गत आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषीपंपांच्या वीजबिलात सवलत अशा विविध सवलतींची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, रोजगार हमी योजनेत अधिक कामे उपलब्ध करून देणे, शेतकरी व शेतमजुरांना धान्यपुरवठा करणे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करणे आणि जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यावरही शासनाने भर दिला आहे.

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करून प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे मदत पोहोचवण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आह

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button