बुलढाणामहाराष्ट्रसामाजिकसांस्कृतिक

नमो बुद्धाय मित्र मंडळ हिंगणा कवठळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 जयंती उत्साहात संपन्न!….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी

रतन भगत

 सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ येथे यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 जयंती फार मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमो बुद्धाय मित्र मंडळ हिंगणा कवठळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी राणी मुकिंदा गव्हांदे यांनी केले तर प्रास्ताविक पर भाषण हिंगणा कवठळ गावाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री मुकिंदा गव्हांदे यांनी केले .त्यांनी आपल्या प्रबोधन पर भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जोपासावे असे संबोधन केले.

सदर कार्यक्रमाच्या वेळी हिंगणा कवठळ गावातील समस्त गावकरी उपस्थित होते ,त्यामध्ये दिनेश चोपडे ,रिया चोपडे ,नंदा चोपडे ,निकिता उमाळे ,प्रियंका चोपडे ,विशाल ससाने, गणेश अढाळे, प्रेम अडाळे इत्यादी मंडळी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या शेवटी उमेश अढाळे यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले हा कार्यक्रम अत्यंत शांततेने पार पडला.
✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button