चिखलीत शिवजयंतीचा उत्साह

आ. सौ. श्वेता महाले पाटील यांच्या उपस्थितीत महिलांची भव्य दुचाकी रॅली संपन्न…
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली ( प्रतिनिधी)
“चिखली हे सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर असून येथे यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करूयात पण पुढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन झाल्यानंतर इतिहासात नोंद होईल अशी शिवजयंती साजरी करूया” असे उद्गार चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी आज शिवजयंतीच्या दिवशी काढले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे स्मरण करून शिवपूजन व विविध कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले होते.रात्री बारा वाजता भव्य आतिषबाजी करून शिवजयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
“छत्रपतींचे आचार-विचार आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजेत. छत्रपतींचा आदर्श समोर ठेवूनच सरकार सर्वसामान्यांसाठी कार्य करत आहे,” असे प्रतिपादन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनी यावेळी केले.
परंपरा जोपासणाऱ्या चिखली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आवश्यकता अधोरेखित करत त्यांनी पुढील शिवजयंतीपर्यंत भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. “इतिहासात नोंद होईल अशी शिवजयंती पुढील वर्षी चिखलीत साजरी करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महिलांची भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. भगवे झेंडे, घोषणांनी दुमदुमलेले रस्ते आणि युवक-युवतींचा उत्साह यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते. महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग विशेष आकर्षण ठरला.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, अंकुशराव पाटील, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, सुरेश आप्पा खबूतरे, कपिल खेडेकर, शिवराज पाटील,नगर परिषद उपाध्यक्ष सौ वैशाली खेडेकर, महिला व बालकल्याण समिती सौ सुषमा ताई चव्हाण , सौ अश्विनी जाधव, सौ प्रिया बनसोडे, सौ विलामलताई देव्हडे, श्रीमती सुंनंदाताई शिनगारे माजी जिल्हा परिषद सदस्य, सौ अर्चनाताई खबुतरे,सौ निताताई सोळंकी तालुका अध्यक्ष महिला मोर्चा भाजप, सौ कांचन ताई पाटील ,सौ मनिषा सपकाळ,,श्रीमती ज्योती ताई वाळेकर,सौ मयुरी खबुतरे, चेतन देशमुख, विजय वाळेकर, विश्वनाथ जाधव, संजय गाडेकर तसेच चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…✍🏻



