बुलढाणामहाराष्ट्र

पंढरपूर शाखेत कार्तिक एकादशी सोहळा साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहुरकर

-शेगांव

कार्तिकी एकादशीला श्रींच्या मंदिरात १ लाखाच्या वर भाविकांनी श्रींच्या समाधी दर्शन घेतले व ६० हजारावर वारकरी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर श्री क्षेत्र पंढरपूर शाखेव्दारा श्री गजानन महाराज मठामध्ये दशमी, एकादशी बारस या कालावधीत १ लाख १० हजारावर भक्तांना महाप्रसाद वितरीत करण्यात आला. तसेच वारी निमित्त पंढरपूर शाखेत आलेल्या ८८ दिंड्यांपैकी नियमाची पूर्तता केलेल्या ८३ भजनी दिंड्यांना भजनी साहित्यासह श्री संत वाययाचे वितरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी धर्मार्थ अॅलोपॅथीक रुग्णालयाच्या माध्यमातून ८००० हजार भाविकांनी आरोग्य सेवेचा घेतला आहे. आतापर्यंत संस्थेव्दारा शेगाव, श्री पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी लाभ श्री क्षेत्र व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या तिर्थक्षेत्री महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक,

व गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा अशा ९ राज्यामधील ७६ जिल्ह्यातून आलेल्या १९ हजार ६०० गावांना भजनी साहित्य व श्री संत बाययाचे वितरण करण्यात आले आहे. अशा रितीने श्री पंढरीनाथाचे व श्री कृपेने वारकऱ्यांची सेवा घडून आली आहे. श्री शाखेत भाविकांसाठी भक्तनिवासात निवास व भोजनप्रसादाची व्यवस्था कार्यरत आहे. शिवाय रात्री उशीरा येणाऱ्या भक्तांसाठी सुद्धा महाप्रसादाचे विनामुल्य वितरण करण्यात येते. तसेच श्री प्रगटदिन, श्री रामनवमी व श्री पुण्यतिथी उत्सव नित्यनेमाने साजरे करण्यात येतात. त्याचबरोबर आषाढी वारी वारीचे प्रसंगी नवमी, दशमी, एकादशी व बारस असे चार दिवस भाविकांना श्री महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. तसेच चातुर्मासात वारकरी परंपरेनुसार चार महिने प्रवचन, भजन, कीर्तन आदिंचे आयोजन केले जात असून चातुर्मासात ५०० वारकऱ्यांना दररोज माधुकरीचे वितरण देखील करण्यात येते. कार्तिक व आषाढी वारीचे वेळेस महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या व नियमाची पूर्तता केलेल्या भजनी दिंड्यांना १० टाळजोड, १ विणा, १ मृदंग, १ हातोडी असे भजनी साहित्य व श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज गाथा व श्री एकनाथी भागवत या संत वाययाचे वितरण करण्यात येते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button