२१ ऑगस्ट भारत बंद ला सम्राट अशोक सेना शामील असणार..SC/ST आरक्षण बचाओ आंदोलन उद्या २१ ऑगस्ट २०२४ ला दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर अकोला इथे आहे सर्वांनी मोठ्या ताकतीने या आंदोलनात सामील व्हा अस्तित्वाची लढाई शामिल व्हा. न्याय हक्कासाठी परत एकदा मैदानात. संघर्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही.!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
विजय घोडे

एससी / एसटी समूहातील सर्वांनी मोठ्या ताकतीने या संघर्षात सामील झालं पाहिजे. उपवर्गीकरण व क्रिमिलियर चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय कसा संविधानाच्या विरोधात आहे हे दाखवून दिलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सविनय भंग करून मोर्चे आंदोलन काढून त्याचा निषेध केला पाहिजे हा निर्णय जाळून टाकला पाहिजे या आंदोलनात सगळ्यांनी शामिल होऊन मोठ्या ताकतीन भारत बंदला प्रतिसाद दिला पाहिजे.पुन्हा हे व्यवस्था आपल्यावर अत्याचार करणार आज आपण लढलो नाही तर गुलाम झाल्याशिवाय आपण राहणार.त्यासाठी सर्वांनी ताकतीने या लढ्यामध्ये सामील होऊन,एससी एसटी ची एकजूट दाखवावी संविधानाविरुद्ध व आरक्षण विरोधी निर्णय रद्द केला पाहिजे हे आपण मागणी केली पाहिजे हेच आम्ही आवाहन करतो.
,,🇮🇳.जय संविधान जय भारत.🇮🇳,,
!!.सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य.!!
,आकाश दादा शिरसाट,,



