Uncategorized

विद्युत खांबावर काम करणाऱ्या कंत्राटी वायरमनचा दुर्देवी मृत्यू

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद | ८ जुलै २०२४महावितरण कंपनीमध्ये गेल्या सहा वर्षापासून कंत्राटी वायरमन म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या ३२ वर्षीय वायरमनचा दि. ६ रोजी संध्याकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली आहे.पारोळा पोलिसात सुनील भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वामीनारायण नगर मधील रहिवाशी श्यामकांत बाबुराव भामरे यांचे चिरंजीव दिनेश शामकांत भामरे (वय ३२) हा गेल्यास सहा वर्षापासून कंत्राटी वायरमन म्हणून काम करत होता. दि. ६ रोजी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास दिनेश भामरे हा म्हसवे गावाच्या पुढे नगाव रोडालगत असलेले इलेक्ट्रिक पोलवर काम करीत असतांना त्यास विजेचा शॉक लागला आहे, असे कळाल्याने नातेकांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन दुसऱ्या वायरमनच्या मदतीने त्यास पोलवरून खाली उतरवले. त्यानंतर दिनेश भामरे यास कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी रात्री दहा वाजता तपासून मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button