महाराष्ट्र

मेडशी मधील पर्जन्य मापक यंत्र उठले शेतकऱ्याचा मुळावर

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – पर्जन्यमापक हे एक साधन आहे जे ठराविक कालावधीत ठराविक भागात पर्जन्याचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते.बहुतेक पर्जन्यमापक मोजण्याचे एकक म्हणून मिलिमीटर वापरतात आणि काहीवेळा मोजमापाचे परिणाम एकक म्हणून इंच किंवा सेंटीमीटरमध्ये असतात.पाऊस पडत असताना या वर्तुळाकार तोंडातून पाणी आत जाते. या साठलेल्या पावसाच्या पाण्याचे दैनंदिन किंवा साप्ताहिक मोजमाप केले जाते व खालच्या छिद्रातून पाणी सोडून दिले जाते.मेडशी मधील पर्जन्यमापक यंत्र हे सौर उर्जेवर चालणारे आहे.सौर प्लेटच्या साह्याने सदर यंत्रामध्ये विद्युत पुरवठा कार्यान्वित होऊन ते काम करते.मात्र गेल्या चार-पाच दिवसापासून अपुऱ्या सौर प्रकाशामुळे ते जसं पाहिजे तस विद्युत प्रभारीत झाले नाही.पाऊस रात्री 2 वाजता नंतर पडल्यामुळे त्याचं कार्यपद्धती ही कमकुवत झाली.जो मुसळधार पाऊस झाला. 22व 23 सप्टेबरच्या रात्री त्याच्या परिपूर्ण माप सदर यंत्रामध्ये मापून सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय येते सक्षमपने पाठवण्यात अयशस्वी झाले. 24 सप्टेंबर रोजी पर्जन्यमापक यंत्र मालेगाव तालुका कृषी अधिकारी यांनी तपासणी केली असता त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की हे मापक यंत्र सक्षमतेने अपडेट देत नाहीत्याचे दुष्परिणाम मेडशी मंडळ मधील शेतकरयांना मोठ्या प्रमाणात भोगावे लागत आहे.मर्यादेपेक्षा जास्त नुकसान होउन सुद्धा बिघाड झालेल्या पर्जन्यमापकयंत्रामुळे या वेळी गावातील शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहे.ह्याला दोष कोणाचा म्हणावा शेतकऱ्याच्या पाठीमागे असलेल्या साडे सातीचा का नशिबाचा ह्याचं उत्तर काळच देईल.

प्रतिक्रिया
गावातील वयोवृद्ध व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार आज पर्यंत 23 सप्टेंबर एवढा भीषण असा महापूर कधीच पहिला नव्हता.नदी नाल्याच्या पात्रात पाणी बसत नव्हते.शेती खरडून गेल्या तरीसुद्धा शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाई पासून वंचित कसा राहिला – अजिंक्य मेडशीकर

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button