खानदेशगुन्हेगारीजळगावा जिल्हा

मुस्कान अभियान’ अंतर्गत ३ महिलांचा यशस्वी शोध

‘मुस्कान अभियान’ अंतर्गत ३ महिलांचा यशस्वी शोध

मुक्ताईनगर प्रतिनिधी | स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

‘मुस्कान अभियान’ अंतर्गत मुक्ताईनगर पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता आणि कार्यक्षमता दाखवत चांगदेव, वडोदा व सुळे परिसरातील अपहरण/मिसिंग दाखल असलेल्या तीन महिलांचा अवघ्या काही तासांत शोध लावून त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले.

सदर प्रकरणात तक्रार दाखल होताच पोलीस यंत्रणेने तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्राथमिक माहितीच्या आधारे संबंधित महिलांची हालचाल , , , , , आदी ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विविध ठिकाणी समन्वय साधून शोधमोहीम राबवण्यात आली.

पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र चाटे, पोलीस हवालदार संदीप वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप देशमुख, सतीश भारुडे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी बोदडे व सुवर्णा पाटील यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी तपास करून तिन्ही महिलांना सुरक्षित ताब्यात घेतले.

यानंतर तिन्ही महिलांची मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे सविस्तर चौकशी करण्यात आली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुस्कान अभियानांतर्गत केलेल्या या जलद व यशस्वी कारवाईमुळे मुक्ताईनगर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button