क्राईमजळगावा जिल्हा
मुलीला फुस लावून पळविलेची तक्रार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । स्थानिक बसस्थानक परिसरातन एका मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना १ मार्च रोजी सकाळी ११ वा.च्या सुमारास उघडकीस आली. याबाबत राहुल वामनराव इंगळे (४३) रा.चिंचोली यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, शेगाव येथील बसस्थानक परिसरातून अज्ञात आरोपीने माझ्या मुलीला फुस लावून पळवून नेले. मुलीचा इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याप्रकरणी झालेल्या फिर्यादवरून शहर पोस्टेला अज्ञात आरोपीविरूध्द कलम १३७ (२) भान्यासं नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



