महाराष्ट्रसामाजिक

मुलीचा वाढदिवस रक्तदान करून साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । येथील छ. शिवाजी नगर येथील जाधव कुटुंबीयांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून रक्तदान व रुग्णाच्या नातेवाईकांना अन्नदान करून कौतुकास्पद उपक्रम राबविला.

आज ३ मार्च रोजी संतोष जाधव यांची मुलगी कु. पलक हिलचा वाढदिवस होता. मात्र मुलीचा वाढदिवस हा वायफळ खर्च न करता रक्तदान करून साजरा करण्याचे जाधव कुटुंबीयांनी ठरविले. त्यानुसार आज ३ मार्च रोजी गजानन मामनकर, राम सावंत, वैभव जाधव, प्रतिभा जाधव आदींनी

रक्तदान केले. तर यावेळी उपस्थितांनी रक्तदानाचा संकल्प केला. त्यानंतर रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना अन्नदानही करण्यात आले. जाधव कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत

आहे.

यावेळी कैलास जाधव, संतोष जाधव, संतोष पाटणे, सौ. अनिता कैलास जाधव, श्रुतिका संतोष जाधव, संघर्ष ग्रुपचे गजानन पाटील तसेच शिवाजीनगर मित्र परिवार उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button