महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंराव नाईक यांची जयंती निमित्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर
आज दिनांक १ जुलै २०२३ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती व राष्ट्रीय वन महोत्सवाची सुरुवात व कृषी दिवस याचे औचित्य साधून गो ग्रीन फाउंडेशन शेगाव द्वारा आयोजित साधूनवृक्षारोपण व वृक्षसंवर्धन तसेच पर्यावरण संवर्धन या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हा उपक्रम राबविण्यात आला.श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगाव च्या मा. प्राचार्या श्रीमती कविताताई पाटील यांच्या परवानगीने श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगाव च्या आदरणीय शिक्षिका मनिषा लांडे मॅडम, अंजली पाटील मॅडम,माया खोडके मॅडम व ऋषिकेश पोगे सर यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या २४० विद्यार्थ्यांना गो ग्रीन फाउंडेशन निर्मित स्वराज्य वन व ऑक्सिजन पार्क येथे नेऊन पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन तसेच प्लॅस्टिक निर्मुलन याविषयी गो ग्रीन फाउंडेशन शेगाव च्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उपस्थित शिक्षीका व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी विद्यार्थी वर्गानी गो ग्रीन चे कार्यापासून प्रेरीत होऊन प्लास्टिक न वापरण्याची व पर्यावरण जपण्याची शपथ घेतली



