बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात! आता महायुती सरकारच्या योजना घरपोच!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

दि १० सप्टेंबर. | शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी जाउन देण्यासाठी दि.१० सप्टेंबर पासून राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियाना’ला सुरुवात होणार आहे. या अभियानाच्या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः १५ कुटुंबांची भेट घेऊन या अभियानाचा शुभारंभ करणार आहेत.

या अभियानात त्यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, सचिव, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी सहभागी होणार असून प्रत्येक शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेतील.

उद्देश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, अशा महायुती सरकारच्या १० महत्त्वाकांक्षी योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे, योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणे, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे तसेच शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती त्यांनी दि. नऊ सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉंफरंस मध्ये बोलत असतांना दिली.

या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, महिला नेत्या मीनाताई कांबळी, माजी खासदार राहुल शेवाळे, खासदार नरेश म्हस्के, प्रवक्ते संजय निरुपम, प्रवक्ते किरण पावसकर, प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सरचिटणीस सिद्धेश कदम, शिवसेना सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल तसेच राज्यभरातील शिवसेना मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी आदि सहभागी झाले होते .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button