बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा शहरातील मुस्लिम बांधवांचा कब्रिस्थानच्या रस्त्याचा प्रश्न लवकरचं मार्गी लावु:- आ.प्रकाश भारसाकळे

तेल्हारा शहरातील मुस्लिम बांधवांचा कब्रिस्थानच्या रस्त्याचा प्रश्न लवकरचं मार्गी लावु:- आ.प्रकाश भारसाकळे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी विजय घोडे

तेल्हारा दि.२० :- अकोला जिल्यातील तेल्हारा या शहरात मुस्लीम बांधवांच्या कब्रिस्तानच्या रस्त्याची अवस्था ही सुरुवातीच्या काळापासूनच अत्यंत दयनीय आहे. आता मात्र मुस्लिम बांधवांच्या कब्रिस्तानच्या रस्त्याची हि अत्यंत दयनीय अवस्था बदलणार असुन याकरिता तेल्हारा शहरातील कब्रिस्तान रस्ता विकास संघर्ष समिती अथक परिश्रम घेत आहे. स्थानिक कब्रिस्थानच्या रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू त्याकरिता नगरपालिकेचा ठराव व अंदाजपत्रक सुद्धा तयार झालेले आहे सदर कामाकरिता शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर केला असून निधी उपलब्ध होताच कामाला सुरुवात करू असे आश्वासन आमदार प्रकाश भारसाकळे यांनी कब्रिस्तान रस्ता विकास संघर्ष समितीच्या सदस्यांना २० नोव्हेंबरला अकोट येथील त्यांच्या कार्यालयात रस्त्या संदर्भात आयोजित बैठकीत दिले.
तेल्हारा शहरातील मुस्लिम बांधवांना कब्रिस्तान मध्ये जान्या करिता जो रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सदर नाल्यातील रस्त्यावर चिखल व खोल वाटा असल्यामुळे मुस्लिम बांधवांसोबतच शेतकरी बांधवांना सुद्धा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तसेच मुस्लिम बांधवांना अंत्यविधी व विविध धार्मिक विधीसाठी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून रस्त्यासाठी मरण यातना सोसाव्या लागत आहेत याकरिता कब्रस्तान रस्ता विकास संघर्ष समितीच्या वतीने या पूर्वी ५ सप्टेंबरला धरणे आंदोलन करण्यात आले होते व त्या नंतर एक महिना पूर्वी संघर्ष समितीने
आ. प्रकाश भारसाकळे यांना निवेदन घेऊन सदर रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे केली होती त्यानंतर नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी सदर कामासंदर्भात तातडीने ठराव घेऊन सदर कामाचे अंदाजपत्रक तयार केले परंतु या कामाकरिता आवश्यक निधी उपलब्ध नसल्यामुळे हा निधी लवकरात लवकर मिळावा याकरिता कब्रस्थान विकास संघर्ष समितीच्या सदस्यांनी अकोट येथे आमदार प्रकाश भासाकळे यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना स्मरणपत्र देऊन सदर काम किती महत्त्वाचे आहे याबाबत सविस्तर चर्चा केली त्यानंतर आ.भारसाकळे यांनी सदर रस्त्याच्या कामाकरिता लवकरच निधीची उपलब्धता व्हावी याकरिता शासनाकडे पाठपुरावा करू व काम लवकर सुरू होईल असे समितीच्या सदस्यांना आश्वासित केले यावेळी रस्ता संघर्ष समितीचे सदस्य रामभाऊ फाटकर, सुरजभैय्या खारोडे, मतीन शहा ,मो शारीक , शेख सलीम मो. सलीम , शेख रहेमान, आदि आवर्जून उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button