महाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथे आशा दिनानिमित्त आशा स्वयंसेविकांचा केला गौरव – विजया रतनसिंग जाधव यांनी मिळाले प्रथम पारितोषिक

मुक्ताईनगर तालुका वैद्यकीय विभागातर्फे मुक्ताईनगर येथे आशा दिनानिमित्त आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी निशा जाधव युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे लाडकी बहीण योजनेचे प्रमुख राहुल पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित घाडेकर डॉक्टर प्रियदर्शी तायडे डॉक्टर सपकाळे डॉक्टर निंभोरे आरोग्य सहाय्यक विजयकुमार पाटील डॉक्टर सोनटक्के मॅडम हे उपस्थित होते. याप्रसंगी उत्कृष्ट व जास्तीत जास्त मोबदला मिळवून देणाऱ्या अशा स्वयंसेविकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वडोदा येथील विजया रतन सिंग जाधव या स्वयंसेवीकेने एक लाख 3 हजार 891 रुपयांचा मोबदला मिळवून दिल्याबद्दल प्रथम पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला तर माया शिवसिंग जाधव हलखेडा यांनी 86 हजार 841 रुपये मोबदला मिळवून देत द्वितीय पारितोषिक पटकावले व आशा गजानन बघे चारठाणा यांनी 19 हजार 563 रुपये मोबदला मिळवून देत तृतीय क्रमांक पटकावला उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये निर्मला अशोक बावस्कर व गटप्रवर्तक रेखा गवळी यांनी 77521 रुपये मोबदला मिळवून दिला दुर्गा गणेश तायडे व गटप्रवर्तक सीता तायडे वडोदा यांनी ६६९६३ रुपये मोबदला मिळवून दिला कविता शांताराम लोखंडे व नीलिमा पाटील गटप्रवर्तक रुईखेडा यांनी 62 हजार एक रुपये मोबदला मिळवून दिला शोभा विजय गोधळे व सुचिता चौधरी गटप्रवर्तक चांगदेव यांनी 52 हजार 400 95 रुपयांचा मोबदला मिळवून दिला वैशाली बाळू निकम व संगीता पंडित हरताळा यांनी 52 हजार 99 रुपये मोबदला मिळवून दिला सुशीला भाऊराव शिरतुरे व वंदना साळुंखे अंतुरली यांनी पन्नास हजार 386 रुपयांचा मोबदला मिळवून दिला तर मायावती अरुण इंगळे व सुनंदा पाटील गटप्रवर्तक उचंदा यांनी 49 हजार 707 रुपयांचा मोबदला मिळवून दिल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाला रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये 14 महिलांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यापैकी हर्षाली मोहन महाजन मुक्ताईनगर यांना प्रथम पारितोषिक सोनाली गणेश महाजन मुक्ताईनगर यांना द्वितीय पारितोषिक तर कविता शांताराम लोखंडे मुक्ताईनगर यांना तृतीय पारितोषिक देऊन गौरव. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक वाडेकर यांनी तर आभार आनंता ठाकरे यांनी मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button