महाराष्ट्रमुबई

.मुंबई स्थित ग्रिन यात्रा ट्रस्ट तर्फे शाळा वसुरी बुद्रुक घोडमाळ विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जनजागृती सत्राचे आयोजन

वाडा – ( सचिन शेलवले ) मुंबई स्थित ग्रिन यात्रा ट्रस्ट तर्फे जिल्हा परीषद शाळा वसुरी बुद्रुक घोडमाळ तहसील वाडा जि. पालघर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने सत्राचे आयोजन करण्यात आले . या सत्रामध्ये ५० विदयार्थी आणि ४ शिक्षक सहभागी झाले होते .
या सत्राचे संचालन ग्रीन यात्रा ट्रस्टच्या काजल गांगण यांनी केले . ज्यामध्ये माधवी भालेकर, पार्थ बागुल, प्रशांतराव अगले ग्रीनयात्रा यांची उपस्थिती होती . सत्रामध्ये विद्यार्थ्यांना हवामान बदल आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याबददल माहिती देण्यात आली . तसेच त्यांना एकल वापराच्या प्लास्टीकच्या धोक्यांविषयी जागरुक करण्यात आले . ज्यामध्ये मायक्रो प्लास्टीक आपल्या अन्न आणि पाण्यातुन शरीरात जाऊ शकते आणि त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो . हे समजावून सांगितले . सत्रा दरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता . त्यांनी ही माहिती समजावून घेतली . आणि पर्यावरण संरक्षणासाठी आपली आवड व्यक्त केली .
सत्राच्या शेवटी ग्रीन यात्रा ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शाश्वत किट देण्यात आल्या . ज्यामध्ये स्टीलची बॉटल, स्टीलचा डब्बा, बांबूचा टूथब्रश आणि रोप लागवडीसाठी उपयुक्त पेन्सिल यांचा समावेश होता . कपड्यांच्या पिशव्यांचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना कपड्याच्या पिशव्याही देण्यात आल्या . शाळेच्या शिक्षकांनी या सत्रात सहकार्य केले . आणि हि काळाजी गरज आहे असे सांगितले . विद्यार्थ्यांमधे अशा प्रकारे जागरुकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमुद केले . याशिवाय विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन व ओला सुका कचरा वेगळा ठेवण्याचे महत्व याबदद्लही माहिती देण्यात आली .
ग्रीनयात्रा टस्टतर्फे आयोजित केलेल्या अशा प्रकारच्या सत्रांमुळे विद्यार्थ्यांमधे पर्यावरणाबदद्ल केवळ संवेदनशीलता वाढत नाही,तर ही स्वच्छ आणि टिकाऊ पर्यावरणाच्या दिशेने महत्वाची पायरी आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button