Uncategorized

 मुक्ताईनगर पोलीस गांजा जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली!!!

मुक्ताईनगर :- प्रतिनिधी

येथे पुन्हा सुमारे 2 लाख 17 हजार रूपये मूल्य असणारा गांजा जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कुऱ्हा येथील रहिवासी नसीर शहा रऊफ शहा हा इसम गांज्याची विक्री करत असल्याची गुप्त माहिती ही मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली होती. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीला देण्यात आली. या अनुषंगाने एलसीबी आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून कारवाई केली. यात पोलीसांसह पंच तसेच अन्य आवश्यक घटकांचा समावेश होता. या पथकाने नसीर शहा रऊफ शहा याच्यावर छापा टाकून त्याला अटक केली.

यात नसिर शहा याच्याकडे सुमारे 13.51 किलो वजनाचा व 2 लाख 71 हजार 400 रूपयांचे मूल्य असणारा गांजा जप्त करण्यात आला. यात नसीर शहा याला अटक करण्यात आली असून एलसीबीचे कर्मचारी संघपाल तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही एलसीबीचे वरिष्ठ निरिक्षक बबन आव्हाड व मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली. ही कारवाई दिनांक 17 रोजी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button