बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा बैठक संपन्न

सभासद नोंदणी अभियानास प्रारंभ

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम ; भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा वाशिम यांची जिल्हास्तरीय बैठक १६ जुलै ला आनंद बुद्ध विहार अकोला नाका वाशिम येथे संपन्न झाली.
जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत यांनी प्रथम विषयाला सुरुवात करून महत्वाची माहिती दिली.राष्ट्री य कार्याध्यक्ष भिमराव साहेब आंबेडकर यां च्या संकल्पनेनुसार देशात २०२४ मध्ये करोडो लोकांचे धर्मांतर करणार आहे.त्याकरीता सर्व स्तरातून संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करने सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून ते काळजीपूर्वक राबविणे आवश्यक आहे, तसेच आजिवन सभासद १००० रू भरून घेण्याचे कळविण्यात आले आहे त्या करिता जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष,व जबाबदार पदाधिकारी ,डिव्हिजन ऑफिसर, केंद्रीय शिक्षक शिक्षीका यांना बंधनकारक करण्यात आले असून, काही इच्छुकांना यात सहभागी करून घेण्यात येईल.
प्रत्येक तालुक्यात चिंतन शिबीर दि. ३० जुलै ला घेण्याचे ठरविले आहे.हयापुढे संघटना बळकट करण्यासाठी सिद्धार्थ भगत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.हयावेळी हरिश्चंद्र जी पोफळे संस्कार विभाग जिल्हा प्रमुख,छगन सरकटे प्रचार पर्यटन प्रमुख, अश्विन खिल्लारे संरक्षण विभाग प्रमुख स.सै.द , प्रा.मुकुंद वानखेडे ता.अध्यक्ष वाशिम, अनिल तायडे मालेगाव तालुका अध्यक्ष,प्रा.शालिग्राम पठाडे रिसोड तालुका अध्यक्ष, नागोराव उचित, अभिमन्यू पंडित, बळिराम पट्टेबहादुर, सुमनताई ताजने, इंदुमती जांरुनकर, मिलनताई बनसोड,रुध्दाताई साबळे, डिव्हिजन ऑफिसर गोपलजी लबडे, आकाश इंगळे, मिलिंद खडशे, प्रदिप पट्टेबहादुर, संजय अंभोरे, गजानन भगत कमांडर,वासदेव मनवर कमांडर, शालिग्राम चुंबळे जिल्हा संघटक,कविता डोंगरदिवे, भगत ताई लाठी,प्रमजित इंगळे, कमांडर,बंडु खंडारे, माधव हिवाळे,देविदास सोनुने, कैलास सुर्वे केंद्रीय शिक्षक,कुलदिप सरकटे,श्रिकिसन सरकटे,संतोष चकरनारायन,संदिप सरकटे, बलखंडे साहेब, रनपाल सावळे ,आनंदा इंगोले, गोविंदराव राऊत,समाधान नवघरे,गजानन नवघरे, राहुल वानखेडे,विलास गुडदे,संजय भगत, उद्धव कांबळे, राहुल अवचार,
धम्मानंद उचित,गजानन धुळधळे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद वाकोडे सरचिटणीस यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button