महाराष्ट्र

महाइग्राम सेवेत ठाणे जिल्हा परिषद द्वितीय…..

स्टार भारत लाईव्ह प्रफुल्ल पहुरकर ठाणे जिल्हा प्रतिनिधी गांवखेड्यांमध्ये संगणकीकृत दाखले म्हणजे जी २ सी, बी २ सी सेवा निर्गतीमध्ये अर्थात १ ते ३३ नमुने संगणकीकृत करून ग्रामपंचायतीचे विविध दाखले, उतारे वितरित केले जात आहे. यासाठी विकसित केलेल्या महाईग्राम पोर्टलमधून ठाणे जिल्हा परिषदने राज्यात सर्वाधिक सेवा निर्गमित करून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिदंल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचे राज्यस्तरीय आढावा ऑनलाईन बैठकीत ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी अभिनंदन केले ठाणे जिल्हा परिषदने आपले सरकार सेवा केंद्रातून नागरिकांना ५९ हजार ५१२ इतके स्वयंघोषणापत्र निर्गमित करण्यात आले आहे. बिटूसी सेवा अर्थात व्यावसायिक सेवा अंतर्गत विविध प्रकारचे रिचार्जेस करणे, ऑनलाईन पेमेंट करणे, टिकिट बुकींग करणे, पीक विमा भरणे, असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करणे, आयुष्यामान भारत कार्ड नोंदणी करणे, बॅंक व्यवहार करणे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button