मी जबाबदारी निभवतो

मी जबाबदारी निभवतो.आमदार खासदार मंत्री हे भ्रष्टाचार तर करतातच पण करचोरी सुद्धा करतात.जागृत नागरिकांनी याचा बोभाटा केला पाहिजे.तरच चोरांना लगाम लागू शकते.रडण्यात,कुडण्यात काहीच तथ्य नाही. कोर्ट सुद्धा शंभरात एका राजकीय चोराला शिक्षा करतात.ती पण खूप उशीरा.आपण नागरिक राजकीय चोरांना उघडे नागडे करू शकतो,एकाच दिवसात,एकाच तासात. आमदार खासदार मंत्री हे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भ्रष्टाचार करतात.करचोरी करतात.ते भ्रष्टाचार उघड करीत नाहीत.आतापर्यंत कोणत्याही कलेक्टर ने एसपी ने किंवा अन्य सरकारी नोकराने आमदार खासदार मंत्री विरोधात तक्रार केली नाही.त्यांचेकडे दस्तावेज असतात.त्यांना अधिकार आहेत.तरीसुद्धा करीत नाहीत.ती जबाबदारी आपण नागरिकांची आहे.मी तरी तसे समजतो.मीच जबाबदार आहे, लोकशाही टिकवण्यासाठी…. शिवराम पाटील९२७०९६३१२२महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव



