१००० रुपयात मिटवा १२ वर्षांपूर्वीचे जुने शेतीचा वाद!

*१००० रुपयात मिटवा १२ वर्षांपूर्वीचे जुने शेतीचा वाद! सलोखा योजनेतून एक तासात होईल शेतीच्या गटाची अदलाबदल*मुंबई विरारबाळू साळवे ७ ऑगस्ट २०२३ सोमवारसोलापूर:- १२ वर्षांपूर्वी शेजारील व्यक्ती किंवा भावकीतील जमिनीचा गट एकमेकांच्या नावे झाला, तो अजून दुरुस्त झालेला नाही. अशा शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या सलोखा योजनेचा लाभ घेता येणार आहे.तलाठ्यांनी पंचनामा करून त्याचा अहवाल मुद्रांक शुल्क जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर सरकारच्या सलोखा योजनेतून अवघ्या एका तासात आणि एक हजारात त्या गटाची अदलाबदल (दुरुस्ती) करून मिळणार आहे.जमिनीची खरेदी-विक्री करताना राहिलेल्या त्रुटींमुळे किंवा अनेक वर्षांपासून वडिलांच्या नावे एका गटातील जमीन, पण वहिवाटीला दुसऱ्याच गटातील जमीन, अशा समस्यांना शेतकरी तोंड देत आहेत. त्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी मंडलाधिकारी, तहसीलदार यांच्या माध्यमातून प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज करावा लागतो.दुसरीकडे वेळप्रसंगी त्यासाठी वकिलांमार्फत बाजू मांडावी लागते. या प्रक्रियेत वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी म्हणून राज्य सरकारने ‘सलोखा’ योजना आणली. आतापर्यंत मोहोळ, अक्कल



