उठा उठा निवडणूक जाहीर झाली !आचारसंहिता पाळण्याची वेळ आली !!

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केला. यानंतर आचारसंहिता सुरू झाली आहे. निवडणूक घोषित झाल्यावर आचारसंहिता लागू केली जातेच आणि निवडणूक प्रक्रिया घोषित झाल्यापासून ते निवडणूक संपून निकाल येईपर्यंत तीचा अंमल असतो. हे म्हणजे उठा उठा निवडणूक जाहीर झाली. आचारसंहिता पाळण्याची वेळ आली. याचे बंधन राजकीय पक्ष व राजकारण्यांना असते.
त्यामुळे कुठल्या ही राजकीय पक्ष व उमेदवार यांना आपल्यालाच मत द्यावं यासाठी कुठलं ही प्रलोभन मतदारांना दाखवता येत नाही. घोषणा करता येत नाही प्रचार करता येत नाही. कुठल्याही जाती धर्म पंताचा आधार हा घेता येत नाही. जर नियम मोडले तर सहा वर्ष आणि कायमस्वरूपी देखील निवडणूक लढवण्यावर बंदी येऊ शकते. तसेच सर्व सामान्य नागरिकांना फारश्या काही तरतुदी नाही. कारण जे राजकीय पक्ष उमेदवार आहेत त्यांना लागू होतात.
आचारसंहितेमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय होतो परिणाम, काय येतात अडचणी?
परंतु, सामान्य माणसानेही या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आचारसंहितेनुसार कडक कारवाई केली जाते. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कोणत्याही नेत्याच्या प्रचारात गुंतला असलात, तरी तुम्हाला या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. जर एखाद्या राजकारण्याने तुम्हाला या नियमांच्या बाहेर काम करण्यास सांगितले, तर तुम्ही त्याला आचारसंहितेबद्दल सांगून तसे करण्यास नकार देऊ शकता. कारण असे करताना आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला ताब्यात घेतले जाऊ शकते.
चौकट २
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी कर्मचारी आचारसंहिता नावाखाली लपतात सामान्य माणसाला काय त्रास आहे त्याचे अधिकाऱ्यांना घेण देणं नाही सामान्य माणसांना त्यांच्या कामाच्या विषयाकडे अधिकारी लक्ष देतच नाहीत आचारसंहिता चालू आहे असा तिचा बांगुलबुआ करीत बसतात. त्यांना काम करण्याची इच्छा नसते म्हणून ही त्यांना सोईची पळवाट असते.
चौकट २
आचारसंहितेच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेलाच त्रास सहन करावा लागतो प्रशासनातील अधिकारी यांचा निवडणुकीच्या काळात मनमानी कारभार सुरू असतो एखाद्याचे महत्त्वाचे ही शासकीय काम आचारसंहितेच्या नावाखाली होत नाही.



