गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जुगार अड्यावर छापा; ७ जणांवर कारवा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप

शेगावः तालुक्यातील ग्राम येऊलखेड येथे सार्वजनिक ठिकाणी एक्का बादशाह नावाचा जुगार खेळतांना ग्रामीण पोलिसांनी ७ जणांवर कारवाई केल्याची घटना ९ ऑगष्ट रोजी दुपारी ३ वाजता घडली.

याबाबत पोकाँ मुकेश जवाहर पवार यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, ग्राम येऊलखेड परिसरात पंचासमक्ष जुगारावर छापा टाकला असता विशाल वासुदेव हिवराळे वय ३५, महादेव गोपाळ लांजूळकर वय ६०, ज्ञानेश्वर त्रंबक शिंगोटे वय ५२, दिलिप किसन खंडारे

वय ४०, प्रकाश विजयसिंग बिसेन वय २५, मुरलीधर भिकुजी पुंडकर रा. येऊलखेड, गजानन गोपाळराव पिसे रा. दानापूर ता. तेल्हारा जि. अकोला हे सार्वजनिक ठिकाणी एक्का बादशाहा नावाचा जुगार खेळत व खेळविताना मिळून आले.

त्यांचे ताब्यातून नगदी ७९० रुपये, ५२ तासपत्ते किं. ५० रुपये असा एकूण ८४० रुपयाचा जुगार मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध अप. नं. २२८/२५ कलम १२ (अ) मजुकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरु आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button