खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक

मुक्ताईनगर ग.स. शाखेतर्फे गुणगौरव सोहळा संपन्न

ज्येष्ठ सभासद व गुणवंतांचा केला सत्कार

मुक्ताईनगर- जळगाव जिल्हा सरकारी नोकरांचे सहकारी पतपेढी जळगाव शाखा मुक्ताईनगर येथे संस्थेच्या ज्येष्ठ सभासद व सभासद गुणवंत पाल्य यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक मनोज माळी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक विजय पवार, संचालक योगेश इंगळे, भुसावळ सोसायटीचे संचालक विक्रांत चौधरी,प्राथमिक शिक्षक संघटनेचे कुंदन वायकोळे तसेच आश्रमशाळा संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेश पाटील हे होते.
संचालक योगेश इंगळे यांनी सोसायटी तर्फे सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत उपस्थितांना माहिती दिली व गुणवंत विद्यार्थ्यांना यापुढे सुद्धा अधिक मेहनत घेऊन यश प्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या, संचालक विजय पवार यांनी संस्थेच्या ध्येयधोरणांविषयी माहिती देऊन गुण गौरव प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर आपल्या अध्यक्षीय भाषणात संचालक मनोज माळी यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती देत उपस्थित ज्येष्ठ सभासद बंधू भगिनी यांचे आभार मानले तसेच विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ सभासद यांचा तसेच जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील अडागळे व योगेश घाटे यांचा सत्कार करण्यात आला, तर विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी खुशी राजेश पाटील, मोहित भंगाळे, चिन्मय चौधरी, निकिता पाटील, अखिलेश भोम्बे, पूर्वा पंडित ,यश आंबतवार, पूर्ती पंडित, सृजक्त कवळे, ईशान बडगुजर ,विनीत पाटील, वेदिका तिडके, अनुराधा वाघमारे ,शे.मिस्वाह अहमद, ऋषिकेश कोळी या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमास आत्माराम सावकारे संजय ठोसर यांचे सह मोठ्या संख्येने जेष्ठ सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप पाटील विभागीय अधिकारी,शशिकांत पाटील शाखाअधिकारी, यांच्या नियोजनानुसार साहेबराव पाटील,निलेश काकने,विजय वारके, सुनील भोई यांनी मेहनत घेऊन सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय निंभोरे यांनी केले.

फोटो कॅप्शन

सभासद गुणवंत पाल्य खुशी राजेश पाटील हिचा गुणगौरव करतांना सोसायटीचे संचालक व प्रमुख पाहुणे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button