महाराष्ट्र

माळेगाव मध्ये कावड यात्रा उत्सव उत्सवात साजरा

संतोष गिऱ्हे माळेगाव बाजार
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी माळेगाव मध्ये कावड यात्रा काढण्यात आली यामध्ये उज्जैन इथून आलेल्या महाकाल कावळ यात्रा आणि साध्वी चंफा माता कावळ यात्रा माळेगाव वाशी या दोन्ही मिळून हजारो भक्तांनी सहभाग नोंदविला ज्यामध्ये महाकाल कावळ यात्रा २१ भरणे आणि साध्वी चंफा माता कावळ यात्रा ७१ भरण्याची कावड काढण्यात आली. साध्वी चंफा माता मंदिराजवळून गावाच्या आत ही कावड यात्रा काढण्यात आली. महादेवाच्या गाण्यांनी डीजेच्या तालावर माळेगाव नगरी दुमदुमली. कावड यात्रा गावाच्या आत मधून श्री राधा कृष्ण मंदिर, महादेव संस्थान महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक करण्यात आला.त्या नंतर सीता माता संस्थान या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक करण्यात आला. हनुमान मंदिर येथे महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक करण्यात आला. यामध्ये गावातील हजारो भाविक भक्तांचा समावेश होता. या कार्यक्रमाला गावातील मित्रमंडळींनी खिरोड्या पासून माळेगाव बाजार पर्यंत फराळाचे वाटप केले तसेच चहापाण्याची वाटप केले. तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांची संपूर्ण टीम यांनी चोक बंदोबस केला. त्यानंतर गावातील वायरमन टीम ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते महादेवाची आरती करून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button