बुलढाणा

मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिन आरोपींचा पर्दाकाश:- चोरटे पोलीसांच्या जाळ्यात!

स्टारभारत लाईव्ह एक्सप्रेस,


प्रतिनिधी संग्रामपूर,


रतन भगत.



 सविसतर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटार सायकल चोरी करणाऱ्या तिन आरोपींचा पर्दाफाश केला. ही कारवाई ६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
   बद्रीनारायण महादेव ठोंबरे रा. वकाणा हे १८ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास औषध आणण्यासाठी बाहेर गेले होते. ते घरी परतल्यानंतर त्यांनी आपली मोटरसायकल आपल्या घरासमोर उभी केली . मात्र १९ जानेवारी रोजी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली. या घटनेची तक्रार तामगाव पोलीस स्टेशनला दाखल होताच गुन्हा नोंदविण्यात आला होता . पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ विष्णू कोल्हे साहेब यांच्याकडे सोपविण्यात आला . तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पोलीसांनी इरशाद खान उर्फ फरीदखान व शेख साजीद रा. जळगाव जामोद या दोघांनाही संशयीत म्हणून ताब्यात घेतले . चौकशीत त्यांनी चोरीची मोटारसायकल शेख जाकीर शे जहाबाज वयवर्षे 33 रा. बगीचा हिवरखेड ता.तेल्हारा याच्याकडून गव्हाण स्वरूपात घेतल्याची माहिती दिली.
     या माहितीच्या आधारे पोलीसांनी मुख्य आरोपी शख जाकीर याचा शोध घेतला . तो सोनाळा येथील बसस्टॉप जवळ असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी पंच व प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेतल्या नंतर चौकशीत आरोपीने मोगर सायकल चोरी केल्याची कबूली दिली. सदर दूचाकी ही शेख साजिद शेख हबीब वय वर्षे ३१ रा. राणीपार्क जळगाव जामोद याच्याकडे असल्याचेकबूल केले. त्यानंतर त्याच्या ताब्यातून सदर मोटार सायकल पंचासमक्ष हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी इरशाद खान उर्फ फरीदखान वय वर्ष २३, शेख साजिद शेख हबीब वय वर्ष ३१दोघे रा. राणी पार्क जळगाव जामोद मुख्य आरोपी शेख जाकीर शेख जहाबात वयवर्षे 3४ रा. बगीचा हिवरखेड ता. तेल्हारा अटक करण्यात आली आहे. या कारवाई मुळे आरोपींना पकडण्यात यश येवून चोरीचा मा हस्तगत करण्यात आला आहे.

✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button