विजेचा धक्का लागून युवकाचा जागीच मृत्यू ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी-प्रशांत चव्हाण
वाशिम : रिसोड तालुक्यातील केनवड या गावी सायंकाळच्या सुमारास घरावरील वाकलेला झेंडा सरळ करायला गेला असता उच्च दाबाच्या विजेच्या संपर्कात आल्याने चि. संकेत संतोष खराटे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर वाचवायला गेल्याने संकेत याची आई सुद्धा गंभीर जखमी झाली.
प्राथमिक माहितीनुसार उच्च शिक्षण घेत असलेला संकेत घरी आला होता सोसाट्याच्या वाऱ्याने घरावरील झेंडा (जो लोखंडी रॉड वर लावलेला होता) हा घरासमोरून गेलेल्या उच्च दाबाच्या तारांवर पडला तेव्हा घरातील वीज गेलेली होती त्यावेळी वीज गेलेली असल्याने संकेत तो झेंडा सरळ करण्यासाठी गेला असता त्याच वेळी वीज प्रवाह सुरळीत झाला आणि विजेच्या संपर्कात येऊन चि. संकेत त्या लोखंडी रोडला चिटकला बाजूलाच काम करत असलेल्या आईचं लक्ष संकेत वर गेलं असता त्याची आई त्याला वाचवायला धावली तेव्हा आई सुद्धा वीज प्रवाहाच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमी झाली. संकेत याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता मृत घोषित केले तर आईवर वाशिम येथे उपचार सुरू आहे. शिक्षण घेत असलेला संकेत याच्या कमी वयातील आकस्मित निधनाने केनवड सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.



