खानदेशजळगावा जिल्हा

मातीचा माणूस उठला की सत्तेचे सिंहासन हादरतात.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर

मुंबई / शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेण्यासाठी बरेच नेते फक्त बोलबच्चन करून जातात. आणि आपली प्रसिद्ध वाढवतात. परंतु याला अपवाद ठरतात बच्चू कडू एक असा नेता ज्याच्या हाती सत्ता नाही. तरीही दिवस-रात्र फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांसाठी झटणारे बच्चू कडू यांनी त्यांच्या आंदोलनामार्फत सरकारला जागे केले आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात होणारे हे आंदोलन मोठ्या मोठ्या ठिकाणी करण्यात आले. आणि बच्चू कडू यांनी तर जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही हा पवित्र घेतला होता. आज झालेल्या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला असून 30 जून 2026 पर्यंत सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जरा का होईना शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला असेल नक्कीच.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button