मालेगावात पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती

वाशिम येथील बाकलीवाल विद्यालयाचा उपक्रम
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव: जिल्हा निवडणूक अधिकारी वाशिम यांच्या द्वारा विधानसभा सर्वत्रिक निवडणूक 2024 मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा स्वीप समिती द्वारा आयोजित पथनाट्य व मालेगाव येथे सादर करण्यात आले यामध्ये बाकलीबाल विद्यालय वाशीमच्या वतीने एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदार संघांना जागृत करण्यासाठी विशेष कार्यक्रम घेतला
आपल्या देशामध्ये लोकशाही असून त्यामध्ये मतदान हा सर्वात मोठा अधिकार प्रत्येक पात्र माणसाला प्राप्त झालेला आहे
परंतु दुर्दैवाने मतदानाची टक्केवारी ही अतिशय कमी आहे त्यामुळे लोकशाहीला हे एक प्रकार घातक असून त्यासाठी शासनाच्या वतीने मतदारांना जागृत करण्यासाठी व जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्याचाच एक भाग म्हणून बाकलीवाल विद्यालय वाशीमच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मालेगाव येथे मेन रोडवर एक पथनाट्य सादर करून त्यामध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी आव्हान करण्यात आले 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवक युवतीनी आपले नाव मतदार यादी तत्काळ नोंदवावे
आपले एक मत हे देशाचे भविष्य घडू शकते असा संदेश या पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला. या पथनाट्य मध्ये बाकलीवाल विद्यालय वाशीमच्या एनसीसी चे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला यावेळी अमोल काळे एनसीसी बाकलीवाल विद्यालय वाशीम मुख्याधिकारी नगरपंचायत मालेगाव पंकज सोनवणे सुरेश राठोडकर निरीक्षक बी आर गवळी कार्यालय अध्यक्ष सौ पवार मॅडम तसेच तलाठी डी ए राहुल अमोल भुरकाळे विजय महाकाळ तहसील कार्यालय मालेगाव हे उपस्थित होते.



