माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे.

जळगाव शहरातील तरुणांना काही मुली वाटसअप मेसेज टाकून पैशांची मदत मागतात .लग्ना बाबत विचारतात.थोढी चर्चा करतात.माहिती घेतात.मुलांना वाटते आपली कोणीतरी दखल घेतली.तो केसांवर हात फिरवतो.ती मदत मागते तर आपण श्रीमंत आणि परोपकारी आहोत.किमान असे लोक तरी समजतात.म्हणून मुले संवाद करतात.त्यात प्रेमाचे लांगूलचालन सुरू होते.एकमेकांना वाटसअप कॉल करतात.अर्थात मुले या जाळ्यात फसतात.एकदा फसले कि पुढे ब्लॅकमेलींग सुरू होते.
असे अनेक तरूण ही आपबीती सांगतात.तर काही सांगतच नाहीत.मुलांनी विचारले तर आम्ही फोन नंबर ब्लॉक करण्याचा सल्ला देतो.त्या मुली तोच फोन नंबर दुसरीला देऊन पुन्हा तसाच प्रयत्न करतात.
ही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली पाहिजे.असे शहाणी माणसे सुचवतात.पण कोणताही तरुण पोलिस स्टेशनमध्ये गेला कि आधी त्यालाच दोषी मानले जाते.तू चालू आहेस.तू बिघडला आहेस.थांब तुझ्या बापाला कळवतो.त्या वेळेस कोणीही मुलगा बापाची अब्रू जाईल या भीतीने हिंमत हारतो.अशी वेदना कोणालाही सांगता येत नाहीत.सांगितले तर बदमाष फक्त तरूणांना समजले जाते.बदनाम फक्त तरूणच होतात.ही अवस्था खूप वाईट असते.
दोन दिवसांनी पेपरला बातमी येते.
मुलाचे प्रेत रेल्वे रूळावर सापडले आहे.त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे.त्याच्या खिशातील मोबाईल वरून आई बापाचा पत्ता मिळाला आहे.
” आई बाबा मी तुम्हाला सोडून जात आहे.माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे.तुम्ही कोणीही नाही.माझी शेवटची विनंती आहे.ताईकडे लक्ष ठेवा.मला माफ करा.”
.. शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



