Uncategorized

श्री संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सवाची महाप्रसादाने सांगता‎‎.

*श्री संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सवाची महाप्रसादाने सांगता‎‎.

*पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट पातूर :- गण गण गणात बोते च्या जायघोषात वं असंख्य भाविकांच्या उपस्थितीत दरवर्षी प्रमाणे यंदाही पातूर शहरातील‎ माऊली मित्र मंडळ तसेच श्री दत्त पंचकर्म केंद्र वं आयुर्वेदिक चिकिस्तालय मित्र परिवार यांचे वतीने गुरुवार पेठ पातूर येथे महाआरती करून श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रगट दिनानिमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करुन‎ कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.‎यावेळी परिसरातील मनमोहक वातावरण, श्रीची मूर्ती व पुष्प सजावट लक्षवेधी ठरली.प्रगट दिनानिमित्त माऊली मित्र मंडळातील सदस्यांनी सेवाभावी वृत्तीने भाविकांना महाप्रसाद वाटपाची सेवा रुजू केली. या वेळी शेकडो‎ भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.‎ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माऊली मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम‎ घेतले.‎अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्रीगजानन महाराज यांच्या अनंत लीला आपल्याला प्रसंगी लहान लहान कृती खूप काही शिकवत असतात “सर्वे भवन्तु सुखिनः” “शिवभावें जीवसेवा” या व्रतांचा अंगीकार करून श्री महाराज आम्हा सर्वांना ते आचरणात आणण्यासाठी सुख,शांती, समृद्धी व निरामय आरोग्य प्रदान करो हीच माऊली मित्र मंडळ तसेच श्री दत्त पंचकर्म केंद्र वं आयुर्वेदिक चिकिस्तालय मित्र परिवाराचे वतीने श्रीचे चरणी प्रार्थना.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button