मलकापूर शहरात आपली आवड या संघटने करून पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचे केले सन्मान

मलकापूर प्रतिनिधी:- पत्रकारांनी समाजातील शेवटच्या घटकाला डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक पत्रकारीता करावी, असे प्रतिपादन भाराकाँचे जेष्ठ नेते, तथा माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख यांनी केले.
माजी नगराध्यक्ष तथा आपली आवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आंदोलन सम्राट अॅड.हरीश रावळ यांच्या पुढाकारातून पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज ९ जानेवारी रोजी मराठा मंगल कार्यालयामध्ये पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश रावत, रमेशभाऊ उमाळकर, सु.म.शिंदे, माजी नगराध्यक्ष हाजी रशिदखाँ जमादार, श्यामभाऊ राठी, शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, समतेचे निळे वादळचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे, भाजपाचे जेष्ठ नेते मोहन शर्मा, न.प.गटेनेते राजेंद्र वाडेकर, राकाँ नेते प्रसाद जाधव, शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, अरूण अग्रवाल, चंदनसिंह राजपूत, ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे, इंजि.सचिन तायडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी हाजी रशिदखाँ जमादार, रमेशभाऊ उमाळकर, अशांतभाई वानखेडे, इंजि.सचिन तायडे, ठाणेदार संदीप काळे, वसंतराव भोजने यांनी पत्रकार व त्यांची कर्तव्ये व समाजाला आरसा दाखविणारी पत्रकारीता याबाबत विचार प्रकट केले.
तर अॅड.हरीश रावळ यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, आज माझ्या राजकीय व सामाजिक कार्याची जी वाटचाल सुरू आहे त्यामध्ये मला पत्रकारांचे लाभलेल्या प्रेमाचा सिंहाचा वाटा असून त्यांच्याच लेखनीने मला आंदोलन सम्राट ही उपादी मिळाली असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मलकापूर शहर, ग्रामीण पत्रकारांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देवून यथोचित सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.नितीन भुजबळ यांनी तर आभार प्रदर्शन गजानन ठोसर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड.हरीश रावळ मित्र मंडळ व आपली आवड मित्र मंडळच्या पदाधिकारी व सहकार्यांनी परिश्रम घेतले.



